बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानमध्ये कोरोनाचा हैदोस; कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली इतक्या हजारांवर

इस्लामाबाद | कोरोना व्हायरसने सर्व जगभरात तांडव घातलं आहे. शक्तीशाली राष्ट्रांचीही अर्थव्यवस्था या व्हायरसमुळे कोलमडू लागली आहे. त्यामुळे लहान राष्ट्रांना याचा फार धोका आहे. अशातच आपलं शत्रुराष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्येही कोरोनाने हैदोस घातला आहे.

पाकिस्तानातील कोरोनाबाधितांची संख्या 2708 इतकी झाली आहे. हा कालचा म्हणजे शुक्रवारचा आकडा आहे. सर्वाधिक बाधा पंजाब प्रांतात झाली असून तेथील कोरोनाबाधितांची संख्या एक हजारावर गेली आहे. त्या देशात आत्तापर्यंत कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानमधील सरकारने या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न हाती घेतले आहेत. त्यांनी जमावबंदीचे आदेश ठिकठिकाणी लागू केले आहेत. पण संपूर्ण देशात कोठेही टाळेबंदी पुकारण्यात आलेली नाही. टाळेबंदीचा खेळ आम्हाला परवडणार नाही, असं पंतप्रधान इम्रान खान यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, कोरोनाशी झुंज देण्यासाठी जागतिक बॅंकेने कालच पाकिस्तानला दोनशे दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी बांधकाम क्षेत्रासाठी शुक्रवारी मोठ्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सांगलीत जयंत पाटलांनी सूत्र हाती घेताच कोरोना आटोक्यात

दिल्लीमध्ये कोरोना कंट्रोलमध्ये आला आहे- अरविंद केजरीवाल

महत्वाच्या बातम्या-

आज जर दिवा किंवा मेणबत्ती लावणार असाल तर सरकारने केलेलं आवाहन नक्की वाचा…

सांगलीत जयंत पाटलांनी सूत्र हाती घेताच कोरोना आटोक्यात

अखेर कनिका कपूरची कोरोनावर मात; पाचव्यांदा कोरोना टेस्ट आली नेगेटिव्ह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More