Top News आरोग्य कोरोना

चिंताजनक! राज्यात आज 16 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई | राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतात. राज्य सरकारकडून कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान राज्यात १६,४२९ नवीन रुग्णांचे निदान झालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात १६,४२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ९,२३,६४१ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण २,३६,९३४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज १४,९२२ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६,५९,३२२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७१.३८ % एवढं झालं आहे.

राज्यात आज ४२३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद केली गेलीये.सध्या राज्यातील मृत्यूदर २.९३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४७,०५,९३२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९,२३,६४१ (१९.६३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५,१७,०६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,३४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महत्वाच्या बातम्या-

करणी सेनेचा कंगणा राणावतला पाठिंबा; कंगणाच्या सुरक्षेसाठी सदस्य विमानतळावर उपस्थित राहणार

‘…तर एकाही अधिकाऱ्याला गाडीत फिरून देणार नाही’; रूपाली पाटलांचा इशारा

“कंगणासारखे उपरे आणि जॅकलीन फर्नांडीस, दिशा पटानी अस्सल मराठी, बरोबर ना?”

कंगणा राणावतला होम क्वारंटाईन करणार- किशोरी पेडणेकर

…अशा लोकांना महाराष्ट्रात राहण्याचा हक्क नाही- अबू आझमी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या