बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या आकडेवारी

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र पुण्यात आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 2,902 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 2,986 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 86 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 20 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1414 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,39,251 इतकी आहे. तर पुण्यात 39,582 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 7,184 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 3,92,485 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 18862 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

आपल्या धन्याला वाचवण्यासाठी मॅरेथाॅन धावलेल्या लता करेंच्या पतीचा कोरोनाने मृत्यु

“नव्या संसदेसाठी, पुतळ्यांसाठी 20 हजार कोटी आहेत मग लसीकरणाला 30 हजार कोटी का नाहीत?”

‘किमान कोरोना काळात तरी….’; सर्वसामान्यांसाठी सुप्रिया सुळेंनी मोदींकडे केली ‘ही’ मागणी

औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपलं पाहिजे- रितेश देशमुख

चिंताजनक! कोरोनावर मात केल्यानंतर रुग्णांना होतंय ‘हे’ गंभीर इन्फेक्शन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More