बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी

पुणे | पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढत आहेत. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्या शिवाय आता उपाय नाही, असा आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागत कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पुण्यातही कोरोना आपले हातपाय पसरवत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 774 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 427 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 4 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. मृतांमधील दोन व्यक्ती पुण्याबाहेरील होत्या.

पुण्यात सध्या 261 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,02,702 इतकी आहे. तर पुण्यात 4919 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4855 जणांना कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,92,928 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आज 7473 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहारातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिका हद्दीत संचार बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तर, अत्यावश्यक सेवामध्ये कामकाज करणाऱ्यांना मुभा देण्यात येणार आहे. तर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कडक कारवाई चालू राहणार आहे, असं महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

बॉसशी बोलला खोटं, प्रकरण झालं मोठं; सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं दिलं ‘हेे’ धक्कादायक कारण!

सलमानच्या ‘त्या’ एक्सगर्लफ्रेंडवर झाला होता बलात्कार, अभिनेत्रीने केला मोठा खुलास

एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी ओलांडली आता…- पंकजा मुंडे

“…तर भारतामुळे आशिया कप पुढं ढकलला जाईल”

संजय राठोड यांच्या प्रेमापोटी लोक पोहरादेवीला आले, त्यांनी येऊ नका म्हटलं होतं- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More