बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाने वडील हिरावले; रात्री अंत्यसंस्कार करुन दुसऱ्या दिवशी पुण्यातील डाॅक्टर कर्तव्यावर रूजू

पुणे | कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. यात डाॅक्टर, पोलीस, पत्रकार यांचाही समावेश आहे. मात्र डाॅक्टर, पोलीस, पत्रकार, असे अनेक लोक आपल्या कामाला प्रथम स्थान देत आहेत. अशातच पुण्यातील संजीवनी हाॅस्पिटलमधील डाॅक्टर मुकुंद पेणुरकर यांच्या कामगिरीने कोणलाही त्यांचा अभिमान वाटेल.

डाॅ. पेणुरकरांचे आई, वडिल आणि भाऊ संजिवनी हाॅस्पिटलमध्ये कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यूशी झुंजत असताना, त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्याच संध्याकाळी पेणुरकरांनी त्यांच्या वडिलांचे अंत्यसंस्कार केले आणि लगेच सकाळी कामावर परतले. त्यांची आई आणि भाऊ आजूनही मृत्यूशी लढत आहेत.

डाॅ. पेणुरकर हे मुळचे नाशिकचे आहेत. कोरोना काळात आपल्या पालकांना आणि भावाला पेणुरकरांनी भावाकडे ठेवलं होतं. मात्र कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचं समजात त्यांनी सर्वांना पुण्याला आणलं. एकीकडे वडील गेल्याचं दु:ख होतं दुसरीकडे आई आणि भाऊ मृत्यूशी झुंज देत होते, मात्र मनावर दगड ठेवून आपण त्यांना वडील गेल्याची बातमी सांगितल्याचं पेणुरकरांनी म्हटलं. तसेच आपण गेल्या वर्षभरापासून कोविड रुग्णांवर उपचार करतो आहे, सगळे वैद्यकीय कर्मचारी खूप तणावाखाली आहेत. काळाची गरज लक्षात घेऊन आपण तातडीने हॉस्पिटलमध्ये रूजू झाल्याचं पेणुरकर म्हणाले.

दरम्यान, डॉक्टरांनी अंत्यसंस्कार करताना त्यांची बहीण आणि काही नातेवाईकांनी त्यांच्या वडिलांचं व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अंत्यदर्शन घेतलं. त्यांची आई व भावाची तब्येत आता सुधारत आहे. त्यांना लवकरच हॉस्पिटलमधून घरी सोडणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

“अमित शहांमध्ये खूप मग्रुरी दिसत होती, ते आकाशात उडत होते”

भटजीला थोबाडीत मारुन लग्न थांबवणं पडलं महागात, जिल्हाधिकाऱ्याला पदावरुन हटवलं

निवडणुका संपल्या! आता मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

मुलांच्या खेळण्यावरुन दोन कुटुंबातील भांडणाने गाठलं टोक; घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘त्या पक्षाला उघडं करण्याचं काम भाजप करणार’, अदर पूनावाला प्रकरणात आशिष शेलार यांचा गौप्यस्फोट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More