आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा, कोरोना चाचण्याचे दर केले कमी
मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभुमीवर जास्तीत जास्त लोकांनी कोरोना चाचणी करावी या उद्देशाने सरकारने कोरोना चाचणीचे दर वेळोवेळी सुधारित केले आहेत. आज खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीच्या दरात राज्य सरकारने पुन्हा एकदा बदल केले.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून सांगितलं आहे की, सरकारने बदल केलेल्या नव्या दराप्रमाणे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार असून रॅपीड अँटीजेन टेस्टचे दरही कमी करण्यात आले असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
अँटीजेन टेस्ट करण्यासाठी आता अवघे 150 रुपये शुल्क घेण्यात येणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज ही घोषणा करून जनतेला कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाकडुन शासन निर्णय काढुन त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरटीपीसीआर चाचणीसाठी पुर्वी सुरूवातीच्या काळात 4500 रुपये मोजावे लागत होते. पण वेळोवेळी काढलेल्या आदेशातुन हे दर कमी करत आता नव्या आदेशानुसार त्यामध्ये कपात करून आता फक्त 500 रुपये एवढे दर निश्चित करण्यात आले आहेत. तसेच खासगी प्रयोगशाळांमध्ये 500 रुपयात आरटीपीसीआर चाचणी करणं आतापासुन बंधनकारक असल्याचं राजेश टोपेंनी बजावुन सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या –
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धडकी भरवणारी; मृत्युसंख्येत नवा विक्रम
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संपुर्ण वाहतुक व्यवस्था 15 दिवस बंद
लेकीला सांभाळायला कोणीच नाही; म्हणून स्वतःसोबत बॉक्समध्ये घेऊन फिरतोय डिलिव्हरी बॉय, पाहा व्हिडीओ
धक्कादायक!!! बेरोजगारीला कंटाळुन पुण्यात इंजिनिअर तरूणाने उचललं हे टोकाचं पाऊल
लॉकडाऊन रद्दच्या निर्णयाचा जल्लोष आला अंगलट; इम्तियाज जलील यांच्यावर झाली ‘ही’ कारवाई
Comments are closed.