Top News कोरोना शेती

दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची होणार कोरोना चाचणी

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणा, राजस्थान तसंच इतर राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीत गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन छेडलंय. दरम्यान आता या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

सोनीपतचे जिल्हा दंडाधिकारी श्यामलाल पुनिया यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. यामध्ये आंदोलन करणाऱ्या ज्या शेतकऱ्यांना ताप आहे अशा शेतकऱ्यांची एक वेगळी यादी तयार करण्यास सांगितली आहे.

ज्या शेतकऱ्यांना ताप आहे त्यांची मोफत कोरोना चाचणी केली जाणार आहे. शिवाय जर कोणी कोरोना संक्रमित असेल तर त्यांना मोफत उपचार देण्यात येणारेत.

कोरोनाच्या परिस्थितीत शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलनासाठी जमले आहेत. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना कोरोना चाचणीसाठी तयार करणं हे देखील एक आव्हान असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूच्या कुटुंबियांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

मुंबईकरांसाठी 15 डिसेंबरनंतर लोकलसेवा सुरु करण्याचा सरकारचा विचार!

“धुळे नंदुरबारच्या निकालावरून महाविकास आघाडीचे उद्याचे भविष्य काय राहील हे स्पष्ट होतं”

राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्त्व कुणाकडे?; शरद पवार यांनी सांगितली ‘ही’ तीन नावं

“सहा महिन्यांचं रेशन सोबत घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या