बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विठुरायाच्या दर्शनासाठी आता कोरोना टेस्ट बंधनकारक नाही!

सोलापूर | महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव सध्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक उपाय योजना केल्या जात आहे. तसेच कोरोना चाचण्यांचं प्रमाणही वाढवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी नुकतच स्पष्ट केलं. राज्यात होणाऱ्या कोरोना चाचण्यांपैकी 75 टक्के चाचण्या या आरटीपीसीआर असल्याचं शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला होता. पण आता या निर्णयातून माघार घेण्यात येत आहे. मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांची कोरोना चाचणी करून मगच त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. अशी भूमिका घेतल्यानंतर या सर्वांमुळे वादाला तोंड फुटू शकतं हे लक्षात आल्यानंतर त्यातून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इतर धर्मीय लोकांच्या प्रार्थना स्थळांमध्ये अशी चाचणी नाही, मग फक्त हिंदू मंदिरातच का? ही वादग्रस्त गोष्ट समोर आल्याने प्रशासनाने रॅपिड अंटीजन टेस्ट करण्याचा निर्णय रद्द केला आहे. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार होती.

नगरपालिका व आरोग्य विभाग अंमलबजावणी करून दर्शनमंडप जवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व भाविकांची कोरोना चाचणी करून मगच त्यांना मंदिरात प्रवेश देणार होते. पण देशातील इतर कुठल्याही मंदिरात अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने यातून अखेर माघार घेतली आणि आपला निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे आता पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला भाविकांना विना कोरोना चाचणी जाता येणार आहे.

थोडक्यात बातम्या

झुम मिटींग सुरू असतानाच अचानक राजकीय नेत्याची पत्नी दिसली नग्नावस्थेत, पाहा व्हिडीओ

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिलासादायक

मोठी बातमी! महाराष्ट्रात लाॅकडाऊन अटळ; वृत्तपत्र संपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

दहावीच्या विद्यार्थिनीवर गॅंगरेप करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घातली गोळी!

‘विषाणू ऐवजी ‘वसुली’ टार्गेट ठेवलं आणि महाराष्ट्राचं वाटोळं झालं’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More