बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लस घेण्याआधी कोरोना चाचणी करणं बंधनकारक; ‘या’ महापालिकेचे आदेश

पनवेल | पनवेलमधील नागरिकांना कोव्हिड रिपोर्ट निगेटिव्ह असल्यानंतरच लस मिळणार आहे. पनवेल मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आनंद गोसावी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. यामुळे नागरिकांना लस घेण्याआधी अँटीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक आहे. याबाबतचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व खासगी लसीकरण केंद्र आणि वर्कप्लेस CVC ला हे पत्र जारी करुन आदेश देण्यात आले आहेत.

कोणत्याही खासगी कोव्हिड लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची अँटीजेन व कोव्हिड RTPCR चाचणी करुन ती निगेटिव्ह असल्यास लसीकरण करावे. तर पॉझिटिव्ह आल्यास त्याला पुढील तपासणीसाठी पाठवावं, असं पनवेल महानगरपालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी म्हटलंय.

पनवेल महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या या आदेशावर अनेक नागरिकांनी नाराजी दर्शवली आहे. कोरोना लसीकरणासाठी कोविड चाचणीचा अट्टाहास कशासाठी?, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षीपासून भारत देश कोरोनासारख्या महामारीचा सामना करत आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना डेल्टा प्लस व्हेरिएंटचं संकट आलं.

थोडक्यात बातम्या- 

“आता तिथे सुखाने रहा, पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे अजून कोणाला दुखवू नका”

साहेब, राष्ट्रपती व्हावेत हीच माझी इच्छा- सीमा आठवले

संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात?; उदय सामंत यांचं सुचक वक्तव्य

“…तरच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी होईल”

घरात पूजा करताना जळत्या कापरामुळे लुंगीने पेट घेतला; मुंबई महापालिकेच्या माजी आयुक्तांचा मृत्यू

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More