बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना चाचणी झाली आता आणखी स्वस्त; राजेश टोपेंची मोठी घोषणा

मुंबई | ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे (Omicron) राज्य प्रशासन सतर्क झालं आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून कोरोना टेस्टिंगवर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या आरटीपीसीआर (RTPCR Test) चाचणीच्या दरात मोठे बदल करण्यात आले आहेत.

खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी आता 350 रूपये आकारले जाणार आहेत. यासंबंधिचे शासन आदेशही आरोग्य विभागाच्या वतीने जारी करण्यात आले आहेत.

संकलन केंद्रावरून नमूना गोळा करणे, त्याची वाहतूक आणि अहवाल यासाठी 350 रूपये आकारले जाणार आहेत. तर क्वारंटाईन सेंटर, कोविड केअर सेंटर, रूग्णालय येथुन नमुना तपासणी अहवालासाठी 500 रूपये आणि रूग्णाच्या निवासस्थानी जाऊन नमूना घेऊन त्याचा अहवाल देण्यासाठी 700 रूपये दर निश्चित करण्यात आला आहे.

दरम्यान, आतापर्यंत पाच ते सहा वेळेस आरटीपीसीआर चाचणीच्या शुल्कात बदल करण्यात आले आहेत. सरकारच्या नव्या निर्णयानूसार कोरोना चाचणीसाठी 350,500 आणि 700 रूपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. राज्यातील कोणत्याही प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही.

थोडक्यात बातम्या-

‘या’ कारणामुळे कतरिना कैफ आणि विकी कौशल विरोधात तक्रार दाखल

महाराष्ट्रात कोरोना खरंच वाढतोय का?, जाणून घ्या आजची आकडेवारी

“शिवसेना म्हणजे डबल ढोलकी”, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

शेकोट्या पेटल्या! ‘या’ तारखेनंतर थंडी आणखी वाढण्याची शक्यता

“…तर OBC आरक्षण परत मिळू शकतं”, फडणवीसांनी सांगितला फाॅर्म्युला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More