बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिवाळ्यात वाढतोय ‘या’ आजाराचा धोका; घ्या ‘ही’ खास काळजी

मुंबई | परतीच्या पावसाने आता काही ठिकाणी विश्रांती घेतल्याने आता राज्यातील अनेक भागात थंडीचं आगमन झालं आहे. त्यामुळे आता स्वेटर, कानटोप्या आणि गल्बज बाहेर निघू लागले आहेत. ऋतू बदलला की अनेकांना त्रास जाणवू लागतो. तर काहींना हिवाळ्यात अनेक आजाराला सामोरं जावं लागतं. अशातच आता हिवाळ्यात न्यूमोनियाचा धोका (Risk of pneumonia in winter) वाढताना दिसतोय.

कोरोनातून (Corona) बरे झालेल्या रूग्णांना न्यूमोनियाचा त्रास जाणवू लागल्याचं अभ्यास संशोधनातून समोर आलं आहे. कोरोना झालेल्या व्यक्ती ज्यांना न्यूमोनिया झाला आहे, अशांमध्ये मृत्यूचं प्रमाण गेल्या दीड वर्षात वाढलेलं दिसत आहे. अशातच आता हिवाळ्यात न्यूमोनियाचं प्रभान आणखी प्रकर्षाने दिसून येतोय.

न्यूमोनिया हा श्वसनाशी संबंधित आजार आहे. या आजारात फुफ्फुसात संसर्ग होतो. हिवाळ्याच्या काळात हवेतील आद्रता कमी असल्याने विषाणूंचा संसर्ग वाढू लागतो. यामध्ये फुफ्फुसांना सुज येते. त्यामुळे मृत्यूचं प्रमाण देखील वाढतं.

दरम्यान, धुम्रपान करणाऱ्या आणि मद्यपान करणाऱ्या लोकांना हा आजार होतो. त्याचबरोबर मधुमेहाचा त्रास असलेल्या रूग्णांमध्ये देखील न्यूमोनिया होऊ शकतो. त्यामुळे पोषक आहाराची देखील गरज आहे. तसेच थंडीच्या काळात घरातून बाहेर पडताना काळजी घेण्याची देखील गरज आहे.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार तो काळ गेला”; ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा पवारांना इशारा

एकेकाळी होती राहुल गांधींसोबत लग्नाची अफवा, आता केला भाजपमध्ये प्रवेश

“सरकारचा निर्णय मान्य आहे का?, सदाभाऊ आणि पडळकरांची फसवणूक झाली”

‘रात्रीस खेळ चाले’तून शेवंताची एक्झिट, जाता जाता सांगितले सिनेसृष्टीतले काळे कारनामे

“ठाकरे सरकारला खानच्या मुलाची चिंता पण पाटलांच्या मुलांची नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More