Top News आरोग्य कोरोना देश

देशात कोरोनाचा धुमाकूळ, गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक रूग्ण….

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दरदिवशी 50 हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळून येत आहे. कालच्या दिवसांत मात्र हा आकडा अधिक पाहायला मिळाला आहे.. गेल्या 24 तासांत 61 हजार 537 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 20 लाख 88 हजार 612 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 933 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली आहे.

देशात सध्या 06 लाख 19 हजार 088 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 14 लाख 27 हजार 006 रूग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारून आता तो 63 टक्क्यांच्या वरती गेला आहे.

 

 

दुसरीकडे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रकोप असलेला पाहायला मिळतो आहे. काल दिवसभरात 10 हजार 483 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर 1 लाख 45  हजार 582 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर प्रतीक्षा संपली..! पुढच्या आठवड्यात रशियामध्ये जगातील पहिल्या कोरोना लसीची नोंदणी होणार

‘त्या’ फ्लॅट्सच्या खरेदीबाबत रियाचा ईडीसमोर मोठा खुलासा; म्हणाली…

ह्या सरकारचं डोकं सरकलंय की काय?, भाजप नेता भडकला

विरोधात बातमी दिल्याने पुरस्कारवापसी, शितल आमटेंनी परत केला दुर्गा पुरस्कार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या