बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाने आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडला, काल एकाच दिवशी तब्बल ‘एवढे’ रूग्ण

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा कहर अगदी भयावह करणारा आहे. आतापर्यंत दररोज सरासरी 10 हजारांपेक्षा अधिक रूग्ण मिळत असताना आता मागच्या 24 तासांत रूग्णसंख्येत आतापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

गेल्या 24 तासांत देशात 13 हजार 586 नव्या कोरोना बाधित केस समोर आल्या आहेत. त्यामुळे भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 3 लाख 80 हजार 532 इतकी झाली आहे.

देशात सध्या 1 लाख 63 हजार 248 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2 लाख 04 हजार 771 रूग्णांन डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

दुसरीकडे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. दररोज तीन ते साडे तीन हजार रूग्णांच्या जवळपास नव्या कोरोनाबाधितांची वाढ होतो आहे.महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

..म्हणून चीन विरोधात शौर्य गाजवलेल्या बिहार रेजिमेंटला ‘किलर मशीन’ म्हणतात!

“मोदीजी…माझ्या पतीचं बलिदान व्यर्थ जायला नको, चीनी सैनिकांना ठार मारा”

महत्वाच्या बातम्या-

फिल्मी बॅकग्राऊंड असूनही फ्लॉप ठरले ‘हे’ स्टार किड्स; पाचवा कलाकार तर सर्वात अनलकी!

महाराष्ट्र हे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य, अन्याय अत्याचार इथे खपवून घेणार नाही- गृहमंत्री

“पंडित नेहरूंना दोष देणार्‍यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More