Top News आरोग्य कोरोना देश

देशात कोरोनाचा प्रकोप, गेल्या 24 तासांतली धक्कादायक आकडेवारी

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दरदिवशी 50 हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळून येत आहे. आजही हा शिरस्ता कायम राहिला आहे. गेल्या 24 तासांत 56 हजार 282 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 19 लाख 64 हजार 537 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 904 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली आहे.

देशात सध्या 5 लाख 95 हजार 501 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 13 लाख 28 हजार 337 रूग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारून आता तो 63 टक्क्यांच्या वरती गेला आहे.

 

 

देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप पाहायला मिळतोय. दररोज 10 हजारांदरम्यान नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आगे. गेल्या 24 तासांत 10 हजार 309 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 1 लाख 45 हजार 661 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोविड रूग्णालयात भीषण अग्नितांडव!; 8 कोरोना बाधीत रूग्णांचा होरपळून मृत्यू

भूमीपूजन सोहळा पार पडताच शिवसेनेची मोठी घोषणा, संजय राऊतांना केलं ऐलान…

…म्हणून आईनंच मुलांसह स्वतःच्या हाताच्या धारदार ब्लेडनं नसा कापल्या; खळबळजनक घटना!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या