नवी दिल्ली | जानेवारी महिन्यानंतर देशातील कोरोना (Corona) परिस्थिती नियंत्रणात आल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरानाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशातील नऊ राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने आरोग्य मंत्रालयही अलर्ट मोडवर आलं आहे.
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, आसाम, मिझोराम, हिमाचल प्रदेश आणि अरूणाचल प्रदेश या राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वाढतोय. या राज्यातील सातत्याने वाढणाऱ्या कोरोना आकडेवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Tajesh Bhushan) यांनी माहिती दिली आहे.
या राज्यात प्रति दशलक्ष लोकसंख्येची सरासरी चाचणी राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली. तसेच या राज्यांमध्ये नवीन प्रकरणाची नोंद मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय या राज्यातील पॉझिटीव्हिटी दर (Positivity Rate) देखील जास्त असल्याचं निदर्शनास आलं आहे.
दरम्यान, कोणत्याही हलगर्जीपणामुळे या राज्यातील परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त टेस्टिंग तसेच होम आयसोलेशनच्या प्रकरणांवर बारीक निरिक्षण ठेवणं आवश्यक असल्याच्या सूचना भूषण यांनी दिल्या. तसेच या राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“देवेंद्र फडणवीस जे बोलले ते त्यांनी सत्तेत येताच केवळ 20 दिवसात करून दाखवलं”
“ओबीसी आरक्षण तुम्ही मिळवून दिलं म्हणताय तर मग आता धनगर आरक्षणही द्या”
‘…तर महिन्याला 5000 रूपये पेंशन मिळेल’; सरकारची भन्नाट योजना
‘उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर…’; पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
कोर्टाच्या सुनावणीनंतर दीपाली सय्यद यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
Comments are closed.