Top News आरोग्य कोरोना देश

देशात कोरोनाचा हाहाकार…. मागच्या 24 तासांतली धक्कादायक आकडेवारी

नवी दिल्ली | देशात कोरोनानं थैमान घातले आहे. चौथ्या लॉकडाऊननंतर आर्थिक गाडी रूळावर आणण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊनच्या अटी काही प्रमाणात शिथील केल्या. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून कोरोनाग्रस्तांची संख्या भलतीच वाढली आहे. गेल्या 24 तासांत 26 हजार 506 कोरोनाबाधित केसेस समोर आल्या आहेत. आतापर्यंतची ही कोरोनाबाधितांची सर्वाधित नोंद आहे.

भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 7 लाख 93 हजार 802 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 475 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली आहे.

देशात सध्या 2 लाख 76 हजार 685 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 4 लाख 95 हजार 513 रूग्णांन डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या कितीतरी जास्त आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारून आता तो 60 टक्क्यांच्या वरती गेला आहे.

 

 

दुसरीकडे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे.  राज्यात बुधवारी कोरोनाच्या 6 हजार 875 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 93 हजार 652 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ट्रेंडिंग बातम्या-

विकास दुबे हत्याकांड; काल ‘या’ व्यक्तीनं केली एन्काऊंन्टरची मागणी, आज झाली सत्य घटना…

कसा मारला गेला विकास दुबे?, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात; पळून जाणाऱ्या दुबेचा एन्काऊंटर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या