Top News देश

देशात कोरोनाचा कहर सुरूच… गेल्या 24 तासांतली चिंताजनक आकडेवारी!

नवी दिल्ली | देशात सलग दुसऱ्या दिवशी नऊ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवारी देशभरात ९३०४ नव्या रुग्णांची भर पडली होती. तर गेल्या चोवीस तासांमध्ये ९८५१ करोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या २ लाख २६ हजार ७७० इतकी झाली आहे. सर्वाधिक करोना रुग्णांच्या संख्या क्रमांकात भारत जगातील सातव्या क्रमांकाचा देश आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एक लाख ९ हजार ४६२ रुग्ण बरे झाले असून हे बरे होण्याचे प्रमाण ४७.९९ टक्के आहे. सध्या १ लाख १० हजार ९६० रुग्णांवर उपचार केले जात आहेत.  मागील २४ तासांत देशात २७३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत करोना व्हायरसमुळे देशात ६३४८ जणांचा बळी गेला आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आसीएमआर) प्रतिदिन नमुना चाचण्यांची क्षमता वाढवली असून ४९८ सरकारी तर, २१२ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये नमुना चाचण्या केल्या जात आहे. आत्तापर्यंत ४२ लाख ४२ हजार ७१८ नमुना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

कडक मुख्यमंत्री धडक निर्णय; आंध्रात टॅक्सीचालकांना मिळणार प्रत्येकी 10 हजार रुपये!

नुकसान भरपाई देताना नागरिकांना विश्वासात घ्या; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

महत्वाच्या बातम्या-

चक्रीवादळ आणि कोरोनाच्या संकटात मुंबईत घडले ‘देवदूता’चे दर्शन!

उद्धव ठाकरेंनी नेतृत्व कसं करायचं असतं हे दाखवून दिलं- बाळासाहेब थोरात

“लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला हे माझं एकट्याचं नाही तर तुम्हा सर्वांचं यश”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या