Top News कोरोना देश

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच…. गेल्या 24 तासांत तब्बल ‘इतके’ रूग्ण वाढले!

नवी दिल्ली | देशात कोरोनानं थैमान घातले आहे. चौथ्या लॉकडाऊननंतर आर्थिक गाडी रूळावर आणण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊनच्या अटी काही प्रमाणात शिथील केल्या. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून कोरोनाग्रस्तांची संख्या भलतीच वाढली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 28 हजार 701 कोरोनाबाधित केसेस समोर आल्या आहेत. आतापर्यंतची एका दिवसातली ही कोरोनाबाधितांची सर्वाधिक नोंद आहे.

भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 8 लाख 78 हजार 254 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 500 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली आहे.

देशात सध्या 3 लाख 01 हजार 609 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 5 लाख 53 हजार 471 रूग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या कितीतरी जास्त आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारून आता तो 62 टक्क्यांच्या वरती गेला आहे.

 

 

दुसरीकडे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. राज्यात रविवारी 7 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून 1 लाख 3 हजार516 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

सचिन पायलट यांनी भूमिका बदलली; भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत!

अभिनेता अभिषेक बच्चनला रूग्णालयातून डिस्चार्ज

पुण्यात 21 वर्षीय तरुणाच्या खुनाचा थरार; रस्त्यात गाठून गोळीबार त्यानंतर कोयत्याने सपासप वार

सचिन पायलट यांचा भाजपात प्रवेश, या काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

पुण्याची लॉकडाऊन नियमावली जाहीर, वाचा… काय सुरू, काय बंद?

…नाहीतर काॅंग्रेस सचिन पायलट यांच्यावर कारवाई करणार, राजस्थानच्या राजकारणाला नवं वळण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या