बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारीबाबत ‘ही’ माहिती आली समोर, वाचा एका क्लिकवर

मुंबई | संपूर्ण राज्यभरात कोरोना (Corona) महामारीने थैमान घातलं होतं. त्यातच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनेही महाराष्ट्रभर हाहाकार माजवला होता. परंतु ही रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

आज दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात 848 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patient) नोंद झाली असून 974 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तसेच दिवसभरात 50 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 9 हजार 187 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण (Active Corona Patient) उपचार घेत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 66 लाख 33 हजार 105 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 64 लाख 79 हजार 396 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त (Corona Free) होऊन घरी परतले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 40 हजार 857 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू (Corona Death) झाल्याची आकडेवारी स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण राज्यात 6 कोटी 50 लाख 47 हजार 491 जणांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, अधिवेशनाचा ‘हा’ पायंडा महाविकास आघाडी मो़डीत काढणार

CBSE माध्यमातून शिकणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

मुंबईत परतल्यानंतर परमबीर सिंहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“माझ्या पराभवामागे ‘या’ नेत्याचा हात; मोठं षडयंत्र रचुन मला पाडलं”

“वाघावर स्वार होऊन परत पायउतार होणं कठीण, मग वाघच…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More