बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं दिसत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 352 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 363 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 1 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,38,876 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 4583 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16059 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,15,757 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागिरकांना दक्षता घ्यायली हवी, महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

टीईटी परीक्षा पुढे ढकलली, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली नवीन तारीख

येत्या 48 तासात ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार… वाचा हवामान खात्याचा अंदाज!

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना बसणार चाप, आता होणार थेट वाहन जप्तीची कारवाई!

“…तर कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या कानशिलात दोन हाणाव्यात”

सोमय्यांच्या अडचणी वाढल्या??, 72 तासांनंतरही माफी न मागितल्याने परबांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More