बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं दिसत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 497 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 395 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 5 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,39,861 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 4801 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16068 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,16,511 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यायली हवी, असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

दिल्लीवरुन फोन आल्यानं राज्यपालांनी सही केली असेल- नाना पटोले

राहुल- अय्यरने मुंबईला धो धो धुतलं! कोलकाताचा मुंबईवर धमाकेदार विजय

”भाजपला 3 वर्षात देशाबाहेर हाकलून लावायचं माझं लक्ष्य आहे”

राष्ट्रवादीच्या महेबुब शेख यांना मोठा झटका, बलात्कार प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय

“महिला सुरक्षेबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची विशेष कार्यशाळा घ्या, महाराष्ट्रातील महिला सुरक्षित रहातील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More