बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Corona Update: कोरोनाबाबत WHOनं दिला गंभीर इशारा, म्हणाले…

मुंबई | गेल्या काही महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत घट पहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. आटोक्यात येत असलेली कोरोनाची परिस्थीती पाहता लवकरच कोरोना नष्ट होणार अशी आशा लागून होती. मात्र अशातच पुन्हा एकदा अनेक ठिकाणी कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे.

कोरोनामुळे पुन्हा चिंतेत वाढ झाली आहे. अनेक भागांत कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. परिस्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. कोरोना महासाथीच्या रोगाविषयी WHO नं गंभीर इशारा दिला आहे.

काही देशांनी कोरोनाच्या चाचण्या करण्याचं प्रमाण कमी केलं आहे. मात्र, तरीदेखील बाधितांचा आकडा वाढू लागला आहे. याचाच अर्थ असा, की आपण आत्ता जे काही बाधितांचे आकडे पाहतोय, ते फक्त हिमनगाचं टोक आहे, असा इशारा WHO नं  दिला आहे.

दरम्यान, एकीकडे ओमिक्रॉन आणि बीए.2 मुळे वेगाने प्रसार होत असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आल्याचा देखील परिणाम बाधितांची संख्या वाढण्यात झाला असावा, असं WHO नं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

31 मार्चच्या आत पूर्ण करा ‘ही’ कामे, अन्यथा बसू शकतो मोठा फटका

मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हरभजन सिंगची राजकारणात एन्ट्री?; AAP कडून मोठी ऑफर

‘तुला ऍडमिट करुन टाकू, गडबड नको’; शिवसेना नेत्याची धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल

तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More