बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंता वाढली! देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पण मृतांच्या संख्येत घट 

नवी दिल्ली | देशात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असल्याचं दिलासादायक चित्र देखील पाहायला मिळालं. त्यातच आता कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूने डोकं वर काढलं असतानाच काल देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

देशभरात काल 41 हजार 806 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय कमी होत असल्याचं दिसून येत असतानाच आता रूग्णसंख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. त्याचबरोबर काल 39 हजार 130 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

काल देशभरात 581 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 4 लाख 11 हजार 989 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. देशभरात सध्या 4 लाख 32 हजार 041 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच आत्तापर्यंत 3 कोटी 01 लाख 43 हजार 850 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. भारतात 39 कोटींहुन अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. तसेच लसीकरणात जागतिक पातळीवर भारताने विक्रम नोंदविला आहे आणि देशातील सर्वाधिक लसीकरण हे महाराष्ट्रात करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

थोडक्यात बातम्या

‘माझे नेते अमित शहा, नरेंद्र मोदी’; पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले….

‘तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?’; फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल

चिंता वाढली! देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पण मृतांच्या संख्येत घट 

“तुमचे आवडते मुख्यमंत्री पाचव्या नंबरवर आहेत हे विसरु नका”

‘इसमे गलत क्या है?’; पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला ‘या’ काँग्रेस नेत्याचा पाठिंबा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More