बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घट, पण धोका अदयाप टळलेला नाही

नवी दिल्ली | गेल्या जवळपास दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगभरात थैमान घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतामध्ये लॉकडाऊनसह अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. पण आता कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे निर्बंधांमधून नागरिकांना शिथिलता देण्यात आली आहे.

मागच्या 24 तासात देशभरात 10 हजार 302 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 11 हजार 787 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आता आटोक्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या देशभरात 1 लाख 24 हजार 868 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर मागच्या 24 तासात 267 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 04 लाख 65 हजार 349 कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

देशभरात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून भारताने 100 कोटींचा विक्रमी टप्पा पार केला. तसेच सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावं, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

नवाब मलिक म्हणतात, ‘मी दुबईला जात आहे, माझ्यावर नीट लक्ष ठेवा’

कृषी कायदे रद्द करण्यामागे काय हेतू होता?, अमित शहा म्हणतात…

व्हॉट्सअॅपला ब्लॉक केल्यावरही करता येणार चॅट; जाणून घ्या कसं?

“पण आताही अंधभक्त बोलतील काय हा साहेबांचा मास्टरस्ट्रोक”

भारतातील पेट्रोल-डिझेल आता अमेरिका स्वस्त करणार?; काय आहे नवा प्लॅन?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More