बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांच्या आत

मुंबई | संपुर्ण जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यातच महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेल्या या रोगावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

काल दिवसभरात महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच सक्रीय कोरोनाबाधितांची रुग्णसंख्याही आता 10 हजारांच्या आत आल्याचं पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात राज्यात 656 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 768 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात कोरोना रुग्णांचा आकडा हा झपाट्याने वाढत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यातच आता ही रुग्णसंख्या आटोक्यात आली असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात काल 8 रूग्णांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यु झाला आहे. त्याचबरोबर सध्या 9 हजार 678 सक्रीय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत 66 लाख 30 हजार 531 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यापैकी 64 लाख 76 हजार 450 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे, असं समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 40 हजार 747 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

थोडक्यात बातम्या

काँग्रेसने आपल्या ‘त्या’ विधान परिषद उमेदवारांची नावं केली जाहीर

“गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही, मी आमदार असताना…”

“आर्यन खानने जे काही भोगलं त्याची भरपाई कोण देणार?”

अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी सुनावलं नवं फर्मान

प्रियांका चोप्रानं नावात केला मोठा बदल, धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More