बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ शहरातील कोरोना आला आटोक्यात; सक्रिय रुग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याचं चित्र पाहायला मिळालं. परिणामी अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या ही गेल्या दोन महिन्यात झपाट्याने वाढत होती. पण आता ही रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच शुक्रवारी 696 नव्या कोरोनाबाधितांची नोंद मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये झाली आहे. तसेच 24 तासात 658 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

मुंबईतील कोरोनातून बरे होणाऱ्या रूग्णांचा दर हा 95 टक्क्यांवर आला असल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याबरोबरच आतापर्यंत 06 लाख 81 हजार 946 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 15 हजार 819 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मुंबईतील कोरोना दुप्पटीचा दर हा 598 दिवसांवर आला आहे. झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. अशीच कोरोना रुग्णसंख्या कमी होत राहिली तर मुंबई लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार?

“संभाजीराजे छत्रपती हे मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजपचेच खासदार”

‘या’ एका व्यक्तीनं तयार केली मॅच विनर्सची फौज; बदलली आहे टीम इंडिया

देशात दीड हजारांच्या जवळपास डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू; मृतांमध्ये इंटर्न डॉक्टरांचाही समावेश

“मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली अन् हिंदमाता येथे पाणी साचलंय त्याला स्मृती इराणी जबाबदार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More