बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतील कोरोना आला आटोक्यात, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | मागील काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

मुंबईत आज दिवसभरात 213 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 281 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आज दिवसभरात 3 जणांनी प्राण गमावला आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,61,146 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 2577 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 16,036 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,39,707 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यायला हवी, असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात

‘या’ बड्या शिवसेना नेत्यासह विश्वास नांगरे पाटीलही किरीट सोमय्यांच्या रडारवर

अमरावती हिंसाचार घटनेवरून महिला व बालविकास मंत्र्यांनी फडणवीसांना दिला ‘हा’ सल्ला

देश कोरोनामुक्तीच्या वाटेवर, पहिल्यांदाच कोरोनामुक्तीच्या दराने गाठला उच्चांक

‘शांततापुर्ण वातावरणातील आंदोलन सरकार दडपत असेल तर…’, दरेकरांचा गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More