बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतील आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी अत्यंत दिलासा देणारी

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं (Corona) संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या (Patient) हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आजची  आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 179 कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patient) नोंद झाली आहे. तसेच आज एकुण 162 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी (Discharge) देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यात कोरोना रुग्णसंख्या सतत वाढत असताना आताची रुग्णसंख्या ही काहीशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 02 हजार 364 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त (Corona Free Patient) झालेल्या रुग्णांचा दर हा 97 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आजपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 7 लाख 40 हजार 709 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत. सक्रिय कोरोना (Active Coron Patient) रुग्णांची संख्या घटल्याने मुंबईची कोरोनामुक्तीकडे आगेकुच होत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.

रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील रुग्णसंख्या ही मागच्या काही दिवसात हळुहळु कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, अधिवेशनाचा ‘हा’ पायंडा महाविकास आघाडी मो़डीत काढणार

CBSE माध्यमातून शिकणाऱ्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

मुंबईत परतल्यानंतर परमबीर सिंहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“माझ्या पराभवामागे ‘या’ नेत्याचा हात; मोठं षडयंत्र रचुन मला पाडलं”

“वाघावर स्वार होऊन परत पायउतार होणं कठीण, मग वाघच…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More