बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 02 कोरोनाबाधितांचा मृत्यू

नागपूर | महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यातून आता दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे.

नागपूर जिल्ह्यात आज 74 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच आतापर्यंत 04 लाख 76 हजार 651 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. आज दिवसभरात नागपूरमध्ये अवघ्या 02 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 9 हजार 015 कोरोनाबाधितांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्युु झाला आहे.

नागपुरमधील कोरोना हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज एकूण 232 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तसेच आतापर्यंत 4 लाख 66 हजार 460 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. सध्या नागपूर हे कोरोनामुक्त होत असलं तरीही प्रशासनातर्फे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नागरिकांना लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात येत आहे. तसेच पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील अनलॉकला सुरुवात झाली आहे. दर आठवड्याला जिल्ह्याचा आढावा घेऊन संबंधित जिल्ह्याचे स्तर प्रशासनातर्फे ठरवण्यात येत आहेत.

थोडक्यात बातम्या

देवाची सावली! उद्यान एक्सप्रेससमोर झोपून देखील महिला जिवंत

सेमी फायनलचा वचपा काढण्यासाठी विराटसेना सज्ज; 11 शिलेदारांची यादी जाहीर!

आजोबा अरुण गवळीचा नातीला खेळवताना फोटो व्हायरल!

मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या निकालाची तारीख जाहीर

आनंदाची बातमी! पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट लहान मुलांना ‘या’ महिन्यात लस देण्यासाठी तयार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More