Top News कोरोना देश

‘या’ तारखेपासून देशात कोरोना लसीकरणाला प्रारंभ!

नवी दिल्ली |कोरोनावरील लसीला आपत्कालीन मंजुरी मिळाल्याच्या 10 दिवसांच्या आत देशात लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. यावरून 13 जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोवीशिल्ड लसीला 3 जानेवारी रोजी आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. या मंजुरीपासून 10 दिवसांच्या आत म्हणजेच देशात 13 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

लसीकरण करणार्‍या एका टीममध्ये 5 जणांचा समावेश असणार आहे. देशात कर्नाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे प्राथमिक लस स्टोअर बनवण्यात आले आहेत, असं राजेश भूषण यांनी सांगितलं.

देशात असे एकूण 37 लस साठवणुकीचे स्टोअर सज्ज आहेत. या ठिकाणांवर लस साठवली आणि तिथूनच इतर ठिकाणी वितरीत केली जाईल, असंही भूषण यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

…तर राज्य सरकार गरिबांना मोफत लस देणार- राजेश टाेपे

…तर मी तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे- गिरीश महाजन

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

पाटलांच्या गावात सोयीची आघाडी! भाजपची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी

कौतुकास्पद! अंधत्वावर मात करत लताने केलं कळसूबाई शिखर सर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या