बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! मुंबईत पुढील दोन दिवस कोरोना लसीकरण बंद

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मात्र लसीचा पुरवठा नसल्यामुळं राज्यातील लसीकरण लांबणीवर पडलंय. अशात पुढील दोन दिवस मुंबईतील सर्व कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवली जाणार आहे. मुंबई महापालिकेने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की 15 व 16 मे 2021 रोजी लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येत आहे. लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच कळवण्यात येईल, असं ट्वीट मुंबई महापालिकेने केलं आहे. लसीच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय.

महाराष्ट्रात 45 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य द्यावं लागेल. म्हणूनच 18 ते 44 वयोगटाला तुर्त लस मिळणार नाही, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे.

45 वरील व्यक्तींना दुसरा डोस भारत सरकार देवू शकत नाही. त्यामुळं दुसरा डोस देणं गरजेचं आहे. असं असल्यानं महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेली लस ही 45 वर्षांवरील लोकांना दिली जाणार आहे. दुसऱ्या डोससाठी 20 लाख डोस हवेत. सध्या केवळ 10 लाख आहेत, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली होती.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यंत्रणांना केलं अलर्ट

कोरोनाच्या भीतीने मदतीसाठी कुणीही आलं नाही; पोरांनी बापाचा मृतदेह हातगाडीवरून स्मशानात नेला

‘गुणरत्न सदावर्ते नीट बोल, आमच्यात माज काढण्याची ताकद आहे’; संयमी विनोद पाटील भडकले

WHO प्रमुखांच्या ‘या’ वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं, दिला हा गंभीर इशारा

‘कुठून हे नग मिळतात?’; ‘या’ भाजप नेत्यावर जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More