महाराष्ट्र मुंबई

“महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कोरोना लसीकरण सत्र रद्द करण्यात आलेलं नाही”

मुंबई | पहिल्या दिवशीचे लसीकरण सुरळीत पार पडल्यानंतर या लसीकरणाच्या मोहिमेत काही तांत्रिक अडचणी आल्याने लसीकरण बंद राहणार असल्याचं वृत्त आरोग्य विभागाने फेटाळून लावलं आहे.

लस नोंदणीसाठीचं ‘को-विन’ अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं 18 जानेवारीपर्यंत लसीकरण थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र आरोग्य विभागालयानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कुठलेही करोना लसीकरण सत्र रद्द करण्यात आलेले नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार असल्याचं आरोग्य विभागालयानं म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोना  लसीसाठी अॅपवर आपल्याल नोंदणी करायला लागणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांना नोंदणी करण्यासाठी अडचण येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

IAS सुनील केंद्रेकर यांचा साधेपणा; पत्नीसह केंद्रेकर दिसले आठवडी बाजारात

‘…त्यावेळी आम्ही कोरोनावरील लस घेऊ’; राजनाथ सिंह यांनी सांगितली वेळ

“…तर अधिवेशनाच्या पहिल्याच भाषणात मी त्यांचं मोठ्या मनाने अभिनंदन करेल”

मी आज अत्यंत आनंदी आणि समाधानी आहे- केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन

महादेवावर नितांत श्रद्धा असलेल्या मुस्लिम शेतकऱ्यानं स्वखर्चातून उभारलं महादेवाचं मंदिर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या