Top News महाराष्ट्र मुंबई

लसीची सुरक्षा आणि प्रभावाची जाणीव करुन देण्यासाठी अदर पुनावालांनी स्वत: घेतली लस; पाहा व्हिडीओ

पुणे | देशात आज कोरोनाच्या लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. जगभर हैदास घातलेल्या कोरोनाचे दिवस आता भरले असं म्हणणं वावगं ठरणार नाही. याच पार्श्वभूमीवर कोविशील्ड लसची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनीही लसीच्या सुरक्षेबाबत खात्री पटवून देण्यासाठी लस टोचून घतेली आहे.

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. कोविशील्ड या ऐतिहासिक प्रयत्नांचा भाग असल्याचा मला अभिमान असल्याचं अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे.

या लसीची सुरक्षा आणि प्रभावाची जाणीव करुन देण्यासाठी मी स्वत: लस घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत सहभागी झालो आहे, असं पूनावाला यांनी ट्विट करत म्हटलं आहे. पूनावाला यांनी लस टोचून घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, आपले डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी यांना सगळ्यात आधी लस दिली जाईल. या सगळ्यांचा कोरोना लसीवर पहिला हक्क असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीचा शुभारंभ केल्यावर देशाला संबोधित करताना म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या-

…नाहीतर मीच पहिली लस घेतली असती- उद्धव ठाकर

तुम्हालाही ‘हा’ मेसेज आला असेल तर सावधान; तुमचे पैसे चोरीला जाऊ शकतात!

“कमळाच्या फुलातील भुंगा म्हणजे मियाँ औवेसी”

प्रसिद्ध अभिनेत्यावर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचे आरोप

“पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या