बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! बुलडाण्यातील मृत महिलेला तामिळनाडूत कोरोनाची लस

बुलडाणा | संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. तसेच 106 कोटींहून अधिक नागरिकांनी आतापर्यंत लसीकरणात सहभाग नोंदवल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झालं आहे. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असताना बुलडाण्यातून अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

बुलडाण्यातील सखुबाई गोपाळ बर्डे या सात महिन्यांपूर्वी मृत झालेल्या महिलेला तामिळनाडूमध्ये निधनाच्या सात महिन्यानंतर लस देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व प्रकारामुळे सखुबाई यांचे कुटुंबीय बुचकळ्यात पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सखुबाई यांचा मुलगा राजेश बर्डे यांच्या मोबाईलवर 2 नोव्हेंबर रोजी सखुबाई बर्डे यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिल्याचा मेसेज प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी कोविन वेबसाईटवर जाऊन लसीकरणाचं प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेतलं, ते प्रमाणपत्र पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

राजेश यांच्या आई सखुबाई गोपाळ बर्डे यांना तामिळनाडूमधील येंनमंगलम प्राथमिक आरोग्य केंद्र, यरोडे येथे कोरोना लस दिल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. हा सर्व प्रकार पाहून संपूर्ण कुटुंबीयांना अनेक प्रश्न पडले. शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे बर्डे कुटुंबियातील एकही व्यक्ती अजूनपर्यंत तामिळनाडूमध्ये गेलेला नाही.

देशात 100 कोटींहून अधिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर आता लसीकरणातील असा गोंधळ समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना राजेश यांनी म्हटलं की, ‘माझ्या आईचं निधन होऊन सात महिने झाले. तसेच त्यांच्या आधार कार्डला माझा मोबाईल क्रमांक लिंक असल्यामुळे सर्व मेसेज मलाच प्राप्त होतात. हा मेसेज पाहिल्यानंतर डोकं चक्रावून गेलं’, असं त्यांनी बोलून दाखवलं.

थोडक्यात बातम्या

देगलूर-बिलोलीच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांना थेट सोनिया गांधी आणि शरद पवारांचा फोन

ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना दिलासा; इंधन दरवाढीला ब्रेक!

“चौकशीला सामोरं गेलं नाही तर मात्र अटक करायचं, तरी महाविकास आघाडी सरकार मजबूत”

“खंजीर खुपसून स्वतःचा विकास करण्याचा मार्ग…”

“…म्हणून नवाब मलिक आणि ज्यांच्यावर आरोप केले त्या सर्वांची नार्को टेस्ट करा”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More