Top News देश

कोरोनाची लस कुण्या पक्षाची नाही, मी आनंदाने घेईन- ओमर अब्दुल्ला

नवी दिल्ली  | समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी कोरोनाची लस ही भाजपची लस असल्याचं म्हटलं आहे. इतकच नाही तर आपण ही लस घेणार नसल्याचंही यादव म्हणाले आहेत. त्यावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही लस कुण्या पक्षाची नाही, आपण आनंदाने ही लस घेऊ, असं ओमर अब्दुल्ला म्हणाले आहेत. ओमर अब्दुल्ला यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

आपण आनंदाने कोरोनाची लस घेणार आहोत. कारण ही लस कुण्या एका पक्षाची नाही तर मानवतेशी जोडली गेलेली आहे, असं ओमर अब्दुल्ला म्हणाले.

दरम्यान, अखिलेश यादव यांनी आपण ही लस घेणार नसल्याचं म्हटलं होतं. कारण ही लस भाजपशी निगडीत असल्यानं आपला त्यावर विश्वास नसल्याचं यादव म्हणाले होते.

 

 

थोडक्यात बातम्या-

“दबावाला बळी न पडता मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं”

“मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा अनेकांनी विडाच उचलला होता, पण…”

खळबळजनक! तू माझ्याशी का बोलत नाहीस म्हणत तरुणाचा अल्पवयीन मुलीवर थेट तलवारीनं वार

जळगाव हादरलं! प्रेमविवाहानंतर पत्नीचा संशयास्पद मृत्यू; पतीनंही प्राण सोडले

‘…तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता’; चंद्रकांत पाटलांचं रश्मी ठाकरेंना पत्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या