वॉशिंग्टन | कोरोना लसीची जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण अमेरिकेच्या फायजर या कंपनीने कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. कोरोनावर लवकरच लस येणार आहे. कारण ही लस चाचणीत 90 टक्के प्रभावी ठरली आहे, असं ट्रम्प म्हणालेत.
फायजर लसीची ज्या स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आली, त्यापैकी 90 टक्के स्वयंसेवकांमध्ये सकारात्मक बदल दिसला, असा दावा कंपनीने केला आहे.
दरम्यान, अमेरिकेची कंपनी फायजर आणि जर्मनीची बायोएनटेक कंपनी दोघे मिळून कोरोनावर लस तयार करण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या लसीची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसी थेट होर्डिंगच्या खांबावर चढली, अन्…
काळ जरी कठीण असला तरी, कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये- अनिल परब
‘एसटी कामगारांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष द्या’; फडणवीसांंचं उद्धव ठाकरेंना पत्र
“राज्यपालांचा फोन आलेला, अर्णब यांच्या नातेवाईकांना भेटू द्या सांगितलं, पण तसं भेटता येणार नाही”
डोनाल्ड ट्रम्प जिंकायला हवे होते, पण आता…- रामदास आठवले
Comments are closed.