बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाची लस घेतल्यानंतर सेक्स करावा का?; महत्त्वाची माहिती आली समोर

नवी दिल्ली |  कोरोनाची लस घेतल्यानंतर काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याबद्दल लोकांच्या मनात सध्या अनेक शंका-कुशंका आहेत. यासंदर्भात सोशल मीडियात आजकाल अनेक चर्चा होताना दिसत आहेत. सोशल मीडिया या लसीबद्दल वेगवेगळे प्रश्न देखील विचारले जात आहेत. यामध्ये एक प्रश्न हा देखील आहे की कोरोनाची लस घेतल्यानंतर आपल्या जोडिदारासोबत लैंगिक संबंध ठेवणं कितपत योग्य आहे?

Photo Courtesy- Pixabay

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांसाठी काय करावे आणि काय करु नये, यासंदर्भात मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, मात्र यामध्ये यासंदर्भात कुठलीही सूचना करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत त्या क्षेत्रातील जाणकारांचं मार्गदर्शन महत्त्त्वाचं ठरतं. त्यामुळेच या क्षेत्रातील जाणकार जोडीदाराशी संबंध ठेवण्याबद्दल काय म्हणतात हे पाहणं महत्त्त्वाचं आहे.

Photo Credit – Pixabay

कोरोना लस घेतल्यानंतर जोडीदाराशी संबंध ठेवताना काही काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य तज्ज्ञांनी दिल्या आहेत. या तज्ज्ञांच्या मतानूसार कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करायला हवा, मात्र त्याआधी फॅमिली प्लॅनिंगपासून दूर रहायला हवं.

Photo Courtesy- Twitter/@sadiquiz

कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे मेडीसीन तज्ज्ञ डॉ. दीपक वर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्राला यासंदर्भात मुलाखत दिली आहे. “लसीचे काही साईड इफेक्ट आहेत आणि लोकांच्या सेक्स लाईफवर याचा परिणाम होईल, असं आत्ताच सांगणं जरा घाईचं काम होईल. लस घेतलेले लोक फार काळ सेक्सपासून दूर राहू शकत नाहीत हे आपल्याला माहीत आहे, मात्र तरी देखील आपण काळजी घ्यायला हवी, कारण काळजी घेणंच दुष्परिणाम होऊ न देण्याचा मार्ग आहे”, असं ते म्हणाले.

Photo Courtesy- Pixabay

लोक फार काळ सेक्सपासून दूर राहू शकत नाहीत हे लक्षात घेऊन त्यांनी एक सल्ला देखील दिला आहे. डॉ. वर्मा म्हणाले, की “कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर महिला आणि पुरुषांनी २ ते ३ आठवड्यांपर्यंत कंडोम सारख्या गर्भनिरोधक साधनांचा वापर करायला हवा, कारण सेक्स दरम्यान सेक्स दरम्यान महिला आणि पुरुषाच्या शरिरातील द्रव पदार्थ एकमेकांच्या संपर्कात येतात.”

“लस आपल्यावर काय परिणाम करते याची अद्याप आपल्याला कल्पना नाही, यामुळे सेक्स करताना कंडोमचा वापर करणं हा सर्वात चांगला आणि सुरक्षित उपाय आहे.” त्यांनी महिलांना यासंदर्भात एक सल्ला देखील दिला आहे. “काही त्रास होत असेल किंवा सेक्सुअल प्रॉब्लेम असेल तर कोरोनाची लस घेण्यापूर्वी अशा महिलांनी स्त्री-रोग तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.”

Photo Courtesy- Pixabay

दरम्यान, कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी अद्याप सुरु आहे, यामध्ये जे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत त्यांना लसीकरणानंतर तीन महिन्यांपर्यंत सेक्स करताना कंडोम वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. आणखी महत्त्त्वाची बाब म्हणजे यामध्ये जे पुरुष स्वयंसेवक सहभागी झाले आहेत त्यांना कोरोनाची लस घेतल्यानंतर तीन महिन्यापर्यंत वीर्यदान करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

Photo Courtesy- Pixabay

सरकारनं यासंदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, त्यामध्ये गरोदर आणि स्तनदा माता यांनी कोरोनाची लस घेऊ नये अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. मात्र लसीकरणानंतर सेक्स करावा की करु नये याबाबत काहीच सांगितलेलं नाही. त्यामुळे आता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जो सल्ला दिला आहे, तो नागरिकांसाठी फायद्याचा ठरु शकतो.

Photo Courtesy- Pixabay

थोडक्यात बातम्या-

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण

“…तर कोरोनाची दुसरी लाटही आली नसती आणि लोकांचे जीवही गेले नसते”

बस कंडक्टर महिलेची निर्घृण हत्या; बुलडाण्यातील थरकाप उडवणारी घटना

…अन् स्वप्नांचा क्षणातच चुराडा झाला; नववधूला घरी घेऊन जाताना नवरदेवाचा रस्त्यातच झाला मृत्यू

कोरोनाबाधित आईची एक चुक बेतली तिच्या चिमुकलीच्या जीवावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More