बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गरोदर महिलांसाठी कोरोना लस सुरक्षित – डॉ. वीके पॉल

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेविषयी तज्ञांकडून शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. अशातच गर्भवती महिलांसाठी कोरोना लस कितपत सुरक्षित आहे याविशयी शंका वर्तवली जात आहे. अशातच आता नीतीआयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी याबाबतचा संभ्रम दूर केला आहे.

नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी गरोदर महिलांच्या लसीकरणाविषयी बोलताना म्हटलं की, लस घेतल्यानं गरोदर महिला आणि बाळाला सुरक्षा मिळेल. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही लस गरोदर महिल्यांसाठी सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं.

गरोदर महिलांनी कोरोनाची लस घ्यावी, असं आवाहन नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी केलं आहे. लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. गरोदर महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्यास वेळेआधी प्रसुती होण्याची शक्यता जास्त आहे. असं एका अभ्यासातून समोर आलं आहे, असंही यावेळी डॉ. वीके पॉल यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोना लस सुरक्षित आहे आणि कोरोनापासून गर्भवती महिलांचे संरक्षण करते. कोणत्याही औषधाप्रमाणेच, लसीचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात, जे सहसा सौम्य असतात. जसं की सौम्य ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होणं किंवा लसीकरणानंतर 1-3 दिवसांपर्यंत अस्वस्थता जाणवते, असं आरोग्य मंत्रालयानं नव्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सांगितलं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

पुण्यातील आजच्या आकडेवारीमध्ये लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

मला सुत्र द्या आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो- देवेंद्र फडणवीस

सोन्या-चांदीच्या दरात आज देखील मोठी घसरण, पटापट तपासा ताजे दर

शाहिद कपूरच्या बायकोची ऑनलाईन फसवणूक; फोटो शेअर करत म्हणाली…

“55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री झाला, 50 नगरसेवकांमध्ये पिंपरी चिंचवडचा महापौर का होणार नाही?”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More