बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लसीमुळे सीरम मालामाल; नफ्याचा आकडा ऐकाल तर थक्क व्हाल!

मुंबई | स्टिलपासून ऑटोमोबाईलपर्यंत, आणि फर्निचरपासून ते रिअल इस्टेटपर्यंत, सगळ्या उद्योगात मंदी आहे. मात्र, औषधांच्या व्यवसायानं आजवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. त्यात सर्वात आघाडीवर आहे, ते म्हणजे पुण्यातलं ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’.

2019-20 या आर्थिक वर्षात सीरमला एकूण 5 हजार 926 कोटी उत्पन्न मिळालं होतं. आणि यातला निव्वळ नफा हा तब्बल 2 हजार 251 कोटी रुपये इतका होता. म्हणजे एकूण उत्पन्नात नफ्याचं प्रमाण तब्बल 41.3 टक्के इतकं होतं. गेल्या वर्षात औषध निर्मितीतल्या 418 कंपन्यांनी 5 हजार कोटींहून जास्त उत्पन्नांची घोषणा केली होती. मात्र, यात सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी सुद्धा सीरमच ठरल्याचं बोललं जात आहे.

पहिल्या लाटेनंतर कोरोना लसीबाबत लोकांच्या मनात भीती होती. मात्र, दुसऱ्या लाटेनंतर चित्र बदललं. लस घेऊनही कोरोना होत असला, तरी लसीमुळे कोरोनाचा त्रास कमी होत आहे, हे लक्षात आल्यानंतर लोकांनी लसीसाठी रांगा लावल्या. म्हणूनच सीरमनंही आता लसीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं आहे. सीरमच्या लस केंद्राला 200 रुपये, राज्य सरकारला 300 रुपये तर खासगी दवाखान्यांना 600 रुपये प्रमाणे एक डोस दिला जात आहे. त्यामुळे जर भविष्यात सीरमनं 50 कोटी डोस विकले, तर सीरम मालामाल होणार आहे.

दरम्यान, कोव्हिशिल्ड लसीची मागणी पाहता सीरमचे अध्यक्ष अदर पुनावालांनी 2.5 अब्ज डोसचं टार्गेट ठेवलं आहे. मात्र, ते उत्पादनही कमी पडलं, तर सीरम वर्षाला 3 अब्ज डोसची सुद्धा निर्मिती करु शकतं. 5 हजार कोटींचा व्यवसाय करुन 41 टक्के नफा कमावणारी सीरम एकमेव कंपनी आहे. लस उत्पादनात कंपनीला साहजिकपणे नफा होणार, हे पुनावालांनी याआधीच स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे सीरमचा आर्थिक फायदा आश्चर्यकारक मानला जात नाही.

थोडक्यात बातम्या

आक्रमक हार्दिक पांड्याला भारतीय संघातून डच्चू, समोर आलं ‘हे’ कारण

13 वर्षाच्या मुलाकडून 25 वर्षीय मोठ्या भावाची हत्या; अत्यंत धक्कादायक कारण आलं समोर

‘धकधक गर्ल’ माधुरीचा 54वा वाढदिवस; जाणून घ्या माधुरी विषयी काही खास गोष्टी

करुणा मुंडेंच्या पुस्तकावरुन वादाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल

गुजरात सरकार आकडे लपवतंय?, 71 दिवसात बनले 1 लाख 23 हजार मृत्यू प्रमाणपत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More