देश

2 वर्षाखालील बालकांवर कोरोना लसीची चाचणीची तयारी सुरु!

नवी दिल्ली | जगभरात कोविड-19 च्या लसीकरणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. काही देशात लसीच्या चाचण्या पूर्ण होऊन ती देण्यातही आली आहे. जगभरात जिथे 12 वर्षांवरील मुलांनाच लसीचा डोस देण्यात येत आहे, तिथे भारत बायोटेकने 12 वर्षांखालील मुलांवरही चाचणी यशस्वी केली.

पुढचा टप्पा म्हणून 2 वर्षांखालील बालकांसाठी या लसीची चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीचे 20 दशलक्ष डोस तयार असून याच्या निर्मितीचा वेग वाढवला जाईल, अशी माहिती भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्ण इल्ला यांनी दिली.

फायझर लसीची चाचणी ऑक्टोबर महिन्यात 12 वर्षांच्या वरील मुलांवर सुरू झाली होती. तसेच मॉडर्ना लसीच्या चाचणीसाठी डिसेंबर महिन्यात 12 वर्षे आणि त्यावरील मुलांच्या चाचणीकरिता नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, भारत बायोटेक प्रथमच त्याहूनही लहान बाळांवर कोरोना लसीच्या चाचणीची तयारी करत आहे.

थोडक्यात बातम्या-

लोकसभा अध्यक्षांची लेक बनली आयएएस, पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश!

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीवर बंदी

टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे तिसऱ्या खेळाडूची कसोटी मालिकेतून माघार

‘…तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का?’; सुभाष देसाई यांनी भाजपला फटकारलं

तेजस्वी सातपुते यांनी पोलीस दलासाठी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; गृहमंत्र्यांनीही केलं कौतुक

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या