बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात एकाच दिवशी 1 लाख नागरिकांना कोरोना लस, सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

पुणे | पुणे शहरामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या बातम्या आपण वाचत आहोत. पुण्याची परिस्थिती चिंताजनक होत असतानाच एप्रिलच्या पहिल्याच दिवशी दिवसभरात पुण्यातील तब्बल 1 लाख लोकांना कोरोना लस देणार असल्याचं उद्दिष्ट पुणे जिल्हा प्रशासनाने ठेवल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून पुणे जिल्हा प्रशासनाने 1 एप्रिल रोजी जिल्ह्यातील 1 लाख नागरिकांना लसीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याची आणि त्या दिशेने योग्य ती तयारीही सुरू करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून लसीकरणासाठी पात्र नागरिकांना 1 एप्रिल 2021 म्हणजेच उद्या जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लस घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मास्क वापरणे सॅनिटायझर वापरून हात स्वच्छ ठेवणे आणि सोशल डिस्ट्न्सिंगचं पालन करणेही गरजेचं असल्याचं त्यांनी नागरिकांना आपल्या ट्विटमधून सांगितलं आहे.

पुणे जिल्हा प्रशासनाच्या या उद्दिष्टाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. कारण देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा हा पुण्यातला असून तो रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना लस देऊन त्यांना सुरक्षित कसं करता येईल याकडे प्रशासन लक्ष देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

लग्नानंतर नवरी स्वतःच गाडी चालवत पोहोचली सासरी; व्हिडीओ तुफान व्हायरल

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा, कोरोना चाचण्याचे दर केले कमी

पुण्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा धक्कादायक आकडा, पाहा आजची आकडेवारी!

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धडकी भरवणारी; मृत्युसंख्येत नवा विक्रम

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संपुर्ण वाहतुक व्यवस्था 15 दिवस बंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More