बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

11 एप्रिलपासून तुमच्या कार्यालयातच कोरोना लस मिळणार, केंद्राकडून राज्यांना तयारीचे आदेश

मुंबई | सर्व सरकारी आणि खासगी कंपनी/कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून आता तुमच्या कार्यालयातच तुम्हाला कोरोना लस दिली जाण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ज्या कार्यालयात 100 कर्मचारी असतील अशा ठिकाणीच कोरोना लसीकरण केंद्र बनवलं जाईल. 11 एप्रिलपासून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अशा प्रकारची लसीकरण केंद्र सुरु केली जाऊ शकतात. तसे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून जारी केलेल्या आदेशानुसार कुठल्याही खासगी किंवा सरकारी कार्यालयात लस घेण्यासाठी 100 पात्र किंवा इच्छुक कर्मचारी असतील अशा कार्यालयातच कोरोना लसीकरण केंद्र बनवलं जाईल. राज्यांना या मोहिमेत मदत करण्यासाठी केंद्राकडून दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. अशा स्थितीत कार्यालयातही वयोगटाच्या मर्यादेनुसार 100 पात्र कर्मचारी असतील तर तिथेच लसीकरण केंद्र सुरु केलं जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील ‘डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स’ आणि महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील ‘अर्बन टास्क फोर्स’ कर्मचाऱ्यांची संख्या आणि पात्रतेच्या आधारावर सरकारी आणि खासगी कार्यालयांची निवड करतील. कार्यालय प्रशासन आपल्या स्टाफमधीलच वरिष्ठ कर्मचाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करतील. हे नोडल अधिकारी जिल्हा आरोग्य विभाग आणि खासगी कोरोना लसीकरण केंद्रांशी समन्वय साधतील.

दरम्यान, राज्यात 3 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा झाला नाही तर तीन दिवसांत लसीकरण बंद पडण्याची भीती टोपे यांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘ही’ 3 लक्षणं असतील तर सावध व्हा; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची लक्षणं आली समोर

विकेंड लॅाकडाऊनबद्दल सर्वात मोठी अपडेट, सरकारनं ‘या’ लोकांना दिली सूट

‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांसह पालकांना ‘हा’ महत्वाचा सल्ला

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

“अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More