बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर लशीचाही फारसा काही उपयोग होणार नाही’; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली | जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या सेंटर ऑफ सोशल मेडिसीन अँड कम्युनिटी हेल्थ विभागाचे अध्यक्ष डॉ. राजीवदास गुप्त यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कोविड अॅप्रोप्रिएट बिहेवियरवर विशेष लक्ष केंद्रित केलं जात असल्याचं डॉ. राजीवदास गुप्त यांनी सांगितलं आहे.

कोविड अॅप्रोप्रिएट बिहेवियरच लोकांना कोविडपासून वाचवू शकेल. कारण आपल्या एका बेसावध क्षणाची कोरोना वाट पाहत असतो. म्हणूनच योग्य वर्तनातून लोक स्वतःचा तर बचाव करू शकतीलच, पण त्याचा प्रसार होण्यालाही प्रतिबंध करू शकतील, असं गुप्त यांनी म्हटलंय.

मोठ्या समुदायाने योग्य वर्तन केलं नाही, तर विषाणूचा फैलाव होण्यासाठी संधीच मिळते. हा विषाणू रूप बदलत राहतो आणि अत्यंत चलाखही आहे. या वर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटचा संसर्ग महाराष्ट्रात काही जणांना झाल्याचं आढळलं आणि एक-दोन महिन्यांत संपूर्ण देशातच तो पसरला, असं गुप्त यांनी सांगितलं आहे.

लोकांचं लसीकरण झालं आणि त्यांनी कोरोनायोग्य वर्तन केलं, तर कोरोनाला संसर्ग होण्यासाठी शरीरच मिळणार नाही. त्यामुळे विषाणूचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी अधिक नेमकेपणाने आपण युद्ध करू शकू. मात्र तसं झालं नाही तर लशीचाही फारसा काही उपयोग होणार नाही, असं डॉ. राजीवदास गुप्त यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

भाजपला मोठा धक्का?; 25-30 आमदार अन् 2 खासदार भाजप सोडण्याच्या तयारीत?

‘…त्या शुक्राचार्यांचं पितळ उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही’; नितीन राऊत आक्रमक

कोवॅक्सिनमध्ये गायीच्या वासराचं सीरम?; भारत बायोटेक अन् केंद्र सरकारनं दिलं स्पष्टीकरण

पुढचे तीन ते चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आणि आजची शिवसेना कुठे?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More