पुणे | कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे हस्तोलंदोन करणं टाळण्याचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी दिला आहे. अजित पवारांच्या कार्यक्रमापूर्वी आयोजकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगलीच तयारी केल्याचं पाहायला मिळतंय.
अजित पवारांच्या कार्यक्रमापूर्वी आयोजकांनी हॉटेल परिसरात औषध फवारणी केली. अजित पवारांनी दिलेल्या सल्ल्यानंतर लोणावळ्यातील हॉटेल मालक बुचकळ्यात पडले होते. अजित पवार येणार नाही असं समजत त्यांनी फ्लेक्स उतरवला मात्र ऐनवेळी तारांबळ उडाली. तो फ्लेक्स पुन्हा लावला.
लोणावळ्यात एका हॉटेलचे उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते होणार होतं. मात्र अजित पवार कार्यक्रमाला येणार नसल्याचा त्यांचा समज झाला. अजित पवार पुण्यातून कोरोना संदर्भातील बैठक घेऊन हॉटेलच्या उद्घाटनाला येत असल्याचं समजल्यावर हॉटेल परिसरात औषध फवारणी करण्यात आली.
दरम्यान, दुबईतू पुण्यात आलेलं दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह अढळलं आहे. त्यानंतर पवारांच्या कार्यक्रमाला गर्दी होणं सहाजिक आहे म्हणून कोरोनावर खबरदारीचा उपाय म्हणून आयोजकांनी निर्जंतुकीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनामुळे पुण्यातील आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना!
आता गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार राहा- जितेंद्र आव्हाड
महत्वाच्या बातम्या-
‘गो कोरोना…कोरोना गो’; रामदास आठवलेंची चीनी नागरिकांसोबत घोषणाबाजी
ज्योतिरादित्य शिंदे वेगळा पक्ष काढणार; या काँग्रेस नेत्याचं भाकित
काँग्रेसला मोठा झटका! ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा
Comments are closed.