बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकार कोरोनाशी लढण्यात व्यस्त; फडणवीस समर्थक राजकारण करण्यात!

मुंबई | संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूनं हाहाकार माजवला असताना महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार या विषाणूसोबत दोन हात करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र अशा परिस्थितीतही देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी राजकारण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असताना देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी मात्र ट्विटरवर #MaharashtraNeedsDevendra असा ट्रेंड चालवला. धक्कादायक बाब म्हणजे ट्रेंड चालवणाऱ्या लोकांमध्ये अमराठी लोकांचंच प्रमाण जास्त होतं.

देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागल्याची खंत त्यांच्या समर्थकांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे अशा प्रसंगी उद्धव ठाकरेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शासकीय यंत्रणा सातत्याने काम करत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत विशेष कष्ट घेताना दिसत आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

पंतप्रधानांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जी काही गरज पडेल ती पुरविण्याचं वचन दिलंय- उद्धव ठाकरे

आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

रंजन गोगोई यांच्या शपथविधीदरम्यान काँग्रेसचा संसदेत राडा; लगावले ‘शेम शेम’चे नारे

राज ठाकरेंची महाराष्ट्र सैनिकांना साद; म्हणतात…

उद्धवा, ‘पक्षपाती’ तुझे सरकार! कोरोनासंदर्भातील शासननिर्णय न मिळाल्यानं मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More