बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#CoronaVirus : षटकार तर मारला आता चेंडू कोण शोधणार? 😂

मुंबई |  कोरोना व्हायरसने अनेकांच्या तोंडचं पाणी पळवलंय. कोरोनाचा सर्वच क्षेत्रांवर परिणाम जाणवतोय. क्रिकेटचं ग्राऊंड देखील त्याला अपवाद उरलं नाहीये. आज न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट सामना पार पडला. या सामन्यावर कोरोनाचा गमतीशीर इफेक्ट पाहायला मिळाला.

न्यूझीलंडच्या फलंदाजाने गगनचुंबी षटकार खेचला. चेंडू थेट प्रेक्षक बसतात तिथे जाऊन पडला. मात्र सध्या लोकांना सामने बघायला बंदी घातल्याने मैदानात प्रेक्षकच नव्हते. त्यामुळे चेंडू मैदानात परत कोण आणणार? असा प्रश्न पडला. यावेळी ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांना प्रेक्षक बसतात तिथे त्यांच्या जागेवर जाऊन चेंडू आणावा लागला.

प्रेक्षकांच्या बसणाच्या अनेक खुर्च्या असल्या कारणाने तो चेंडू देखील ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांना लवकर दिसला नाही. त्यामुळे त्यांचा चेंडू शोधायला कस लागला. या झाल्या प्रकारामुळे पूर्वी ग्रामीण भागात काट्या-कुपाट्यात किंवा नाल्यात चेंडू जायचा आणि अनेकदा शोधूनही मिळायचा नाही, असा एकंदरित फिल आजचा क्रिकेट सामना पाहताना आल्याचं अनेक प्रेक्षकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ट्वीटरवर अनेक युझर्सने हा मजेदार व्हीडिओ पोस्ट केला आहे. कोरोनाचा असाही गमतेशीर अंदाज चर्चेचा विषय ठरतो आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“केंद्रात गो-गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील तुम्हाला पण नाही समजणार”

“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी”

महत्वाच्या बातम्या-

कोरोना गो हा टिंगल-टवाळीचा विषय नाही, तो एक प्रतिमात्मक नारा- रामदास आठवले

शहरातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी; गावाकडील शाळा मात्र सुरुच राहणार!

“शेतात नांगर धरणारा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज उपाध्यक्ष पदावर बसतोय याचा आनंद”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More