पुणे महाराष्ट्र

‘पुण्यातील ‘जम्बो कोविड सेंटर’चं काम जलदगतीने पूर्ण करा’; अजित पवारांचे निर्देश

पुणे | राज्य सरकार, पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नेहरूनगर येथे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. याची पाहणी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आज पाहणी केली. त्यावेळी ‘कोविड सेंटरचे काम जलदगतीने पूर्ण करावे, असे निर्देश अजित पवारांनी दिलेत.

पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यानुसार राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. वाढत्या रूग्णांच्या सोयीसाठी पिंपरी येथील नेहरूनगर मध्ये नव्याने एक हजार बेडचे कोविड सेंटर उभारण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी येणारा पन्नास टक्के निधी राज्य सरकार आणि पन्नास टक्के निधी पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका, पीएमआरडी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळणार आहे.

पमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिसरात फिरून रूग्णालय कसे उभारले जाणार आहे, याची माहिती घेतली. तसेच आयसीयू बेडची उभारणी करताना त्यांची उंची किती असावी, कोणत्या प्रकारचे साहित्य वापरण्यात येणार आहे. याबाबतचीही माहिती घेतली.

प्रशासनाने कोवीड केअर सेंटरचे काम जलदगतीने पूर्ण करावे. आॅक्सिजन बेडची क्षमता वाढविण्यात यावी. काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे का, काम चांगले करा. पावसाचे पाणी साचणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी, असं अजित पवार म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी भाजपकडून ‘या’ परदेशी महिलेच्या चौकशीची केली मागणी

मुंबईत येणाऱ्यांसाठी महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

ठाकरे सरकारचा ‘हा’ निर्णय उच्च न्यायालयाने बदलला

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या