Top News देश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक मंत्र्यांनी घेतला हा मोठा निर्णय!

नवी दिल्ली | ‘कोरोना’च्या संकटामुळे देशभरात टोलवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही दिलासादायक घोषणा केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात देशभरातील सर्व टोलनाके बंद राहतील. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

तातडीच्या सेवा किंवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने अडथळ्याविना जावीत, यासाठी देशभरातली टोलवसुली रद्द करण्यात आली आहे. रस्त्यांची देखभाल आणि टोल नाक्यांवर आपत्कालीन स्रोतांची उपलब्धता नेहमीप्रमाणे सुरु राहील,असं गडकरींनी स्पष्ट केलं.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 606 वर पोहोचली असून त्यामध्ये 43 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना विलंब होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनपर्यंत म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत देशात कुठल्याही टोलनाक्यावर टोलवसुली होणार नाही.

 

ट्रेंडिंग बातम्या-

ठाकरे सरकारच्या राज्यात पोलीस बेफाम, पत्रकाराला केली मारहाण

मोदी सरकार 80 कोटी लोकांना 2 रूपये किलोने गहू आणि 3 रूपये किलोने तांदूळ देणार

महत्त्वाच्या बातम्या-

महाभारताचं युद्ध 18 दिवसांत जिंकलं, कोरोनाचं युद्ध 21 दिवसांत जिंकायचंय- नरेंद्र मोदी

प्लीज पप्पा… बाहेर जाऊ नका बाहेर कोरोना आहे; लहानग्या चिमुकल्याची पोलिस बापाला आर्त साद

मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार सुरूच; मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांना पोलिसांनी पकडलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या