मुंबई | कोरोना व्हायरसचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेलाही बसायला लागला आहे. जगभरातल्या शेअर बाजाराप्रमाणे मुंबईचा शेअर बाजारदेखील कोरोनामुळे गडगडला आहे. आज शेअर बाजार बंद होत असताना सेन्सेक्स 1448 अंकांनी कोसळला आहे. यामुळे अवघ्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे साडे पाच लाख कोटी बुडाले आहेत.
गेल्या 6 दिवसांत गुंतवणूकदारांच्या 10 लाख कोटींना चुना लागला आहे. त्यामुळे कोरोनाचा विळखा आता भारतीय अर्थव्यवस्थेला बसल्याचं दिसत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये देखील अडीच ते तीन टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. अमेरिका, जपान, साऊथ कोरिया या शेअर बाजारांमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली.
भारतीय बाजारमध्ये मेटल, ऑटो सेक्टर, आयटी, ऑईल, गॅस, तसंच सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका यांना मोठा फटका बसलेला आहे. याचमुळे आज दिवसभरात गुंतवणूकदारांचे साडे पाच लाख कोटी बुडाले आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येतीये.
दरम्यान, अर्थव्यवस्था कोलमडल्याने गुंतवणूकीसाठी सोन्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे सोन्याचे दर 46 हजारांच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे. यामुळे ऐन लग्नसराईत सोनं भाव खाण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
राज्यसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावावर शिक्कामोर्तब!
अध्यादेश काढून लवकरच मुस्लिम आरक्षण लागू करु- नवाब मलिक
महत्वाच्या बातम्या-
अमृता खानविलकरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून आई झाली थक्क
सोनिया गांधींनी आम्हाला ‘राजधर्म’ शिकवू नये; भाजपचा पलटवार
आवडता खासदार कोण?; सुप्रिया सुळेंनी सांगितलं भाजपच्या ‘या’ खासदाराचं नाव
Comments are closed.