Top News देश

जम्मू-काश्मीरमध्ये 8 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

Loading...
श्रीनगर | भारतात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत 700 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या दरम्यान जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे एका 8 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे.

आठ महिन्याच्या बाळाला कोरोना झाल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या आठ वर्षीय बाळाचे कुटुंब नुकतेच सौदी अरबवरुन भारतात परतले. या लहान बाळाच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Loading...

श्रीनगरमधील रुग्णालयात या कुटुंबाला दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत जगभरात 5 लाखांपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकेत आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 82 हजार 400 वर पोहोचली आहे. तर चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 81 हजार 700 आणि इटलीमध्ये 80 हजार 500 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

घरात, रुग्णालयात की फोटो फ्रेममध्ये, कुठे राहायचं हे तुमच्या हातात- अमोल कोल्हे

अन्नधान्याचा काळाबाजार होत असेल तर थेट मला फोन करा- दादा भुसे

महत्वाच्या बातम्या-

फक्त लॉकडाऊन करून चालणार नाही तर…; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला

खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये- उद्धव ठाकरे

कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच भीम जयंती साजरी करू- रामदास आठवले

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या